आभाळ फाटलं ही कविता

                      आभाळ फाटलं.                                                                                                        
ढग दाटुन येता भाभाळ फाटलं , बळीराजाच 
हृदय अश्रुनं दाटल । 
त्यानं आपलं बस्तान शेतामधी थाटलं , मुक्या
जीवांना सुद्धाकी रे थंडीनं गाठलं । 
मोत्यावानी पीक उभ्या थेंबात वाकलं , सुर्यदेवानं मुख ढगाआड झाकल । 
रूप पिकाचं माझ्या धुक्यानं माखलं , म्हणे
बळीराजा माझं कुठ चुकलं , माझं कुठ चुकलं । 
कसं आभाळ फाटलं , कर्म आभाळ फाटलं // 
दिमा मागं दिस येता , अदकृपेने बांधलं , द्रिष्ट 
लागली शेता माझ्या मनी विचाराची धांदल / 
काय कल , कस कल , मला कोण सांगाल , कम
आभाळ फाटलं , कसं भाभाळ फाटलं ।। 
दिम माटा , रात माटी हात चिखलामंदी माखलं , 
पाय बांधा मंदी कतलं / 
तेल घालुनिया डोळ्यामंदी , पीक हातदिन राखलं 
खत पाणी घालुनिया पीक जोमात जपलं । 
येता पावसाच्या सरी पीक सारं मातीआड लपलं ,
मातीआड लपलं / 
कसं आभाळ फाटलं , कसं आभाळ फाटलं //
बनविला देह माझा निश्चयाचा महामेरू , उरी 
बांधलिया स्वपना आता कुठे मी पेरू । 
चंद्र माड्या भाग्याचा कुठे - कुठे मी हेरू . 
घाम मोत्याचा घरट्यात कमा मी भरू । 
धीर मना देवुनिया देवी माते साकडं मी घातलं , ठेव 
सुखी बळीराजा , घाल टाका आभाळा / 
घाल टाका आभाळा , कसं आभाळ फाटलं , 
कसं आभाळ फाटलं //

Comments

Popular posts from this blog

मनाचे चित्र :- मराठी कविता

प्रियकरासाठी:- कविता