Posts

Showing posts from October, 2021

बाया

Image
रानातील बारीक सारीक हिरवाई तोडून , खुडुन , उपटून बांधुन बाजारात नेतात बाया  नफ्यातोट्याच्या व्यवहारात  वाटं घालुन तराजू घेऊन कष्ट तोलतात बाया  मळक्या नोटांच्या घडीतनं  तेल , मीठ , साबणं घेताना  मोबाईल रिचार्जसाठी एखादी नोट काढून ठेवतात  धुण्याच्या पाण्यावरची आळू ,  पडिकातला तांदूळजा , माठ विकून  मिसरी , तपकीर नं तंबाखू आणतात बाया  रस्त्यावर बाटलीतलं थंडपेय  एकाच नळीनं पिणाऱ्या पोरापोरींना हसताना  गावठी , अडाणी ठरतात ,  तेव्हा उष्ट्या पाण्याला तोंड न लावणाऱ्या  मुक्या तितराबाचं कौतुक करतात बाया .  दुसऱ्यांच्या बांधाची गवतं कापून  तिसऱ्याला विकून टाकतात  पण असला पैसा पचत नाय सांगत  लेकरांना साळंत धाडतात  एकरेघी , दुरेघी वह्या , पेनं आनंदानं आणतात बाया .  हुलगं , मूग मटकीच्या बोट बोट शेंगात  पसाभर दाणं शोधतात  गाजरं , मुळं उपटलेल्या पोकळीत  जिवाचं रितेपण भरतात आणि दुष्काळाची झळ .