शेतक - याचे हुंदके ही कविता।Hundake is a poem by a farmer | Marathi poems | Moral poems | poem's in Marathi | Marathi शेतक - याचे हुंदके भाज्यांचा बाजार भाव , भलताच खाली आला । भाजीपाला ढोराहिचा , बणला हिरवा पाला ।। शेतक - याची टिंगल , घेतात अवघे नस्ता । म्हणून तर भाजीपाला , विकतो येवढा सस्ता ।। कांद्याचा भाव वाढला , जो तो लागला रडाया । मसाला लावून सर्वत्र , कांद्याच्याच बढाया ।। किलोने होणारी हराशी, गंजाने होवू लागली । शेतक - याच्या कष्टाला , भक्कम कीड लागली ।। महागाई वाढली की , लोकांना नाही पेलत । स्वस्ताई भाली म्हणजे , कोणीच नाही बोलत ।। अडत्या करे हराशी , व्यापारी बोलतो भाव । दोघेही चपळाईने , साधून घेतात डाव ।। शेतक - याच्या विरुद्ध सर्व ठोकतात दंड । म्हणून त्याच्या वेदनांना , पडत नाही खंड ।। सर्वानिच बळीकडे , फिरवली आहे पाठ । म्हणूनच तो म...