बांध कोरून कोरुन


बांध कोरून कोरुन 
कोरता येईल का हो शेजाऱ्यांचे नशीब 
कोरता येईल का त्याच्या वाट्याचे 
मूठभर सुख 
आख्खे शिवार पाण्यावाचून तडफडताना 
आणखी रान कोरून चोरून 
भागेल का त्याची तहान 
 कोरणे -चोरणे नित्याचेच 
 अन् दुष्काळ , नापिकीही नित्याचीच
 फक्त माणुसकी विकून आपण 
भरणार आहोत काय 
राक्षसी लालसेचं पोट 
यापेक्षा काय लागणार होती जेव्हा 
आख्खे कुणबीपण पणाला लागत असताना 
एक होऊन लढण्यापेक्षा 
बाधाच्या वादात मश्गुल आपण 
कुणब्यानो , आवरा रे सावरा रे भरभर 
ऐकू येतेय पोशिंदा जमातीला लागलेली घरघर

Comments