बाया










रानातील बारीक सारीक हिरवाई
तोडून , खुडुन , उपटून बांधुन बाजारात नेतात बाया
 नफ्यातोट्याच्या व्यवहारात 
वाटं घालुन तराजू घेऊन कष्ट तोलतात बाया 
मळक्या नोटांच्या घडीतनं 
तेल , मीठ , साबणं घेताना
 मोबाईल रिचार्जसाठी एखादी नोट काढून ठेवतात 
धुण्याच्या पाण्यावरची आळू , 
पडिकातला तांदूळजा , माठ विकून
 मिसरी , तपकीर नं तंबाखू आणतात बाया
 रस्त्यावर बाटलीतलं थंडपेय 
एकाच नळीनं पिणाऱ्या पोरापोरींना हसताना 
गावठी , अडाणी ठरतात , 
तेव्हा उष्ट्या पाण्याला तोंड न लावणाऱ्या
 मुक्या तितराबाचं कौतुक करतात बाया .
 दुसऱ्यांच्या बांधाची गवतं कापून 
तिसऱ्याला विकून टाकतात
 पण असला पैसा पचत नाय सांगत 
लेकरांना साळंत धाडतात 
एकरेघी , दुरेघी वह्या , पेनं आनंदानं आणतात बाया . 
हुलगं , मूग मटकीच्या बोट बोट शेंगात 
पसाभर दाणं शोधतात 
गाजरं , मुळं उपटलेल्या पोकळीत 
जिवाचं रितेपण भरतात आणि दुष्काळाची झळ .

Comments

Popular posts from this blog

मनाचे चित्र :- मराठी कविता

प्रियकरासाठी:- कविता

आभाळ फाटलं ही कविता