आई
लेकरांसाठी आपली 'आई '
स्वतःची उपाशी राही
मूल जेवल्याचे पाहून
तिला ढेकर येई
जेव्हा तिच्या बाळाला
जखम एखादी होई
तेंव्हा त्याची कळ
आईच्या काळजात येईल
चुका केल्या कितीही
तरी आईच पदरात घेई
आईसारखे दुसरे दैवत
जगात मिळणार नाही
आईच्या मायेची सावली
जेव्हा डोक्यावरून दूर होई
तेव्हा आपलं या जगात
दुसरं कोणीच नाही.
Comments
Post a Comment