शेतक - याचे हुंदके ही कविता । Hundake is a poem by a farmer.
शेतक - याचे हुंदके ही कविता।Hundake is a poem by a farmer | Marathi poems | Moral poems | poem's in Marathi | Marathi
शेतक - याचे हुंदके
भाज्यांचा बाजार भाव , भलताच खाली आला ।
भाजीपाला ढोराहिचा , बणला हिरवा पाला ।।
शेतक - याची टिंगल , घेतात अवघे नस्ता ।
म्हणून तर भाजीपाला , विकतो येवढा सस्ता ।।
कांद्याचा भाव वाढला , जो तो लागला रडाया ।
मसाला लावून सर्वत्र , कांद्याच्याच बढाया ।।
किलोने होणारी हराशी, गंजाने होवू लागली ।
शेतक - याच्या कष्टाला , भक्कम कीड लागली ।।
महागाई वाढली की , लोकांना नाही पेलत ।
स्वस्ताई भाली म्हणजे , कोणीच नाही बोलत ।।
अडत्या करे हराशी , व्यापारी बोलतो भाव ।
दोघेही चपळाईने , साधून घेतात डाव ।।
शेतक - याच्या विरुद्ध सर्व ठोकतात दंड ।
म्हणून त्याच्या वेदनांना , पडत नाही खंड ।।
सर्वानिच बळीकडे , फिरवली आहे पाठ ।
म्हणूनच तो मृत्यूची , धरत असतो वाट ।।
सरकार शेतक - याच्या , लात मारते छातीत ।
खुटचीतल्या वामनांनी , बळी घातला मातीत ।।
शेतक - याच्या अंगात , उरलं नाही रगत ।
तरी चिल्यापिल्यांसाठी , तो असतो जगत ।।
राजकारण्यांची शेती , भरभरून पिकते ।
शेतकरी धावू - धावू , घाम रगत ओकते ।।
अशाने जावू लागला , शेतक - याचा जीव ।
पण कोणालाही त्याची , येतच नसते किव ।।
शेतक - याचे हुंदके , कुणाला ऐकू येतात ? ।
अशावेळी अवघे , बहि - याच सोंग घेतात ।।
वाहणारे अश्रूत्याचे , कोणीच नाही पुसत ।
त्याच्या हताशपणाला , सर्वच आहे हसत ।।
कवी:-
Comments
Post a Comment