लिलाव
लिलाव ही कविता | Marathi poems | Moral poems | poem's in Marathi | लिलाव
लिलाव
किती असावी स्वप्ने तरी ?
तू रंगवलेले काही
अन् मी पाहिलेले कितीतरी !
पण .....
अर्थच नव्हता या माझ्या रंगहीन स्वप्नांना
कारण .....
मी पाहीलेली स्वप्नं
माझ्याकडेच होती
पण त्यांना रंगवण्याचे रंग
ते मात्र तूझ्याकडे होते !
शेवटी स्वप्नही माझेच होते
भावनाही माझीच होती
मात्र ...दोन्ही गोष्टी तूझ्यासाठी
विनामूल्य होत्या
म्हणूनच म्हणतो
जाण ठेव अथवा न ठेव
एकच सांगतो
ध्यानात ठेव अथवा न ठेव
यौवनात येताना
शरीराचे चोचले पुरवणयासाठी
भविष्याचा विचार न करता
वचन तू मला दिलंस आणि
जराशी बावरताना
लग्नाच्या बाजारात प्रतिष्ठेसाठी
भावनेला गहाण ठेवून
स्वप्नांचा ' लिलाव केलास
स्वप्नांचा " लिलाव " केलास .
Comments
Post a Comment