तू
तू
मनातल्या राजकुमारीचं
प्रत्यक्ष रूप म्हणजे तू
उमलणाऱ्या कळीचे
स्मीत म्हणजे तू
मनाच्या गाभाऱ्यातून
चेहऱ्यावर उमटणारी प्रीत म्हणजे तू
कोकीळेच्या मुखातून
निघणारे प्रत्येक गीत म्हणजे तू
इंद्रधनूचे प्रत्येक रंग म्हणजे तू
प्रत्येक वस्तुतून येणारी
आठवण म्हणजे तू
मनातला प्रत्येक
विचार म्हणजे तू
Comments
Post a Comment